“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन” – रेणू शर्मा

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गायिका रेणू शर्मा नावाच्या तरूणीने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत.मात्र ते आरोप फेटाळून लावत मुंडेंनी करूणा शर्मा म्हणजेच रेणू शर्माची मोठी बहिण यांच्यासोबत असलेल्या आपल्या नात्याची कबुली दिली .

मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं. यासंबंधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यावर रेणू शर्मा यांनी ब्लॅकमेलच्या मुद्द्याशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? असं सांगत आपण शेवटरपर्यंत लढणार असल्याचं म्हटलं आहे.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच रेणू आणि तिचा भाऊ खंडणीसाठीच आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यावर रेणू यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. ब्लॅकमेलशिवाय ते कशाचा आधार घेऊ शकतात? पण मी मरेपर्यंत लढत राहणार, असं रेणू यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दलही रेणूने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलीस असो की इतर राज्यांची पोलीस, मी सर्वांचा आदर करते. पण काही लोक त्यांच्या पदाचा फायदा उठवून पोलिसांना काम करू देत नाही, असंही रेणूने म्हटलं आहे.

आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं मुंडे सांगत आहेत. त्याचवेळी दोन महिलांशी संबंध असून मुलेही झाल्याची कबुली देत आहे. त्यामुळे कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे तुम्हीच पाहा, असंही तिने म्हटलं आहे. रेणू यांनी एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून मुंडेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

दरम्यान, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.