शोभीता कोकीतकर यांना हिरकणी पुरस्कार ;कोकीतकर यांच्या कार्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली दखल

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील): गोवा राज्यातील सरकारच्या भ्रष्टाचारमुक्त व कोरोना काळातील उत्तम कामगिरीमूळे अँटी करप्शन ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री प्रमोद पांडुरंग सावंत यांची भेट घेतली.यावेळी फाउंडेशनच्यावतीने आदी सामाजिक विषयांवर चर्चा करण्यांत आली.

याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.योग्य नियोजनमूळे कोरोना,व इतर भ्रष्टाचारवर आळा घालण्यात आमचे प्रशासन यशस्वी ठरले आहें,असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी मांडले.त्याचप्रमाणे अँटी करप्शन ऑफ इंडिया फाउंडेशनचे देशभर उत्तम कार्य चालू असून नेहमी प्रशासनकडून योग्य सहकार्य मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले.

गोव्यातील पणजी येथे अँटी करप्शनची दखल घेत उत्तम कामगिरीबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोभीता कोकीतकर यांचा हिरकणी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यांत आला.

यावेळी इंटरनॅशनल डायरेक्टर शोभा कोकीतकर ,गोवा राज्या अँटी करप्शनचे अध्यक्ष सतीश नाईक,उपाध्यक्ष नैनेश गावडे,चेअरमन पांडुरंग खवनेकर,मुख्य संचालक यशवंत धाउसकर,मुख्य प्रभारी सुनील मेवाडा ,विराज नाईक,चंदगड तालुकाध्यक्ष संजय गावडे व आदी पदाधिकारी उपस्थित होते

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.