संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू – देवेंद्र फडणवीसाची सूचक प्रतिक्रिया 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर फेसबुकवरून काल (12 जानेवारी) खुलासा करत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली तसेच आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावर, आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. नाशिकमध्ये जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

औरंगाबादचं नामांतर हे तर डुप्लिकेट काम’

यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचं संभाजीनगर केलंय. खरे तर त्यांच्याकडे अधिकार आहे. ते अधिकार पदावर आहेत. त्यांनी ट्विटरवर असं काही टाकण्यापेक्षा प्रस्ताव मंजूर करून निर्णय घ्यावा. हे म्हणजे डूप्लिकेट काम झालं, असा चिमटा काढतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेची मिलीजुली कुस्ती सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.