बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक
पुणे :बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
निखिल वसंत जगदाळे (वय 32, साई चौकाजवळ, आंबेगाव पठार) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कुख्यात अफसर कांबळे गॅंगचा सक्रिय सदस्य आहे.
निखिल जगदाळे हा सराईत गुन्हेगार असून, धनकवडी येथे 2012 साले झालेल्या धुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार निखिल जगदाळे पर्वतीदर्शन येथील पुलाखाली पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत घेतली असती त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. 30 हजार 400 इतकी त्याची किंमत आहे. त्याने हे पिस्टल जवळ का बाळगले होते, याचा तपास केला जात आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोमाजी राठोड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार , पो. हवा. कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पो. अं. महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!