मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांकडून अटक

पुणे : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एकाला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २५, रा. थिटे वस्ती, बैंक ऑफ बडोदाच्या पाठिमागे, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात घरफोड्या व वाहन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. काही केल्या या घटना कमी होत नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालून चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान सिंहगड रोड पोलीस हद्दीत गस्त घालत होते.

यादरम्यान पोलीसांनी सराईत वाहन चोर महेश उर्फ मायकल याच्या बद्दल माहिती मिळाली त्यानुसार त्याला ऍक्टिव्हासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तपास केल्यानंतर त्याने अहमदनगरसह पुण्यातील विविध भागातून 7 दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली. 1 लाख 80 हजार रुपयांच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.महेश उर्फ मायकल हा कार चालक म्हणून काम करतो. त्याने मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.