शरद पवारांच्या ‘गंभीर’ वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय पवार साहेब आणि पक्ष जे ठरवेल ते, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे हे जनता दरबारासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आले आहेत. जनता दरबार संपल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतील.

काय म्हणाले शरद पवार?

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराच आरोप आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला.” “धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितली माहिती या नेत्यांपुढे मांडणार आहे. त्यांची मतं जाणून घेऊन पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ,” असं शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंवर काय आहेत आरोप?

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.