कोल्हापुरातील बोंद्रे नगर झोपडपट्टीतील ७७ पात्र लाभार्थ्यांना लवकरच हक्काचे घर देणार – गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

मुंबई : कोल्हापुरातील बोंद्रे नगर झोपडपट्टीतील ७७ लाभार्थीना पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत लवकरच हक्काचे घर उपलब्ध करून देणार असल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. बोंद्रेनगर झोपडपट्टीवासियांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही.आर. श्रीनिवास, कोल्हापूर महानगरपालिकेचे युवराज जबडे, शेल्टर असोसिएटस्  या सामाजिक संस्थेचे दिलीप कांबळे व गृहनिर्माण विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

बोंद्रे नगर झोपडपट्टी या शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. सदर झोपडपट्टी ही ‘सर्वांसाठी घरे 2022’ या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यापैकी 77 पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण विभाग व महानगरपालिका यांनी लवकर कार्यवाही करावी व  महानगरपालिकेने  सत्वर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.