महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 6 लाखाची खंडणी

पिंपरी चिंचवड :महिलेच्या नकळत तिचा अश्लील व्हिडीओ काढून तिला पाठहून तो व्हिडीओ इतर ठिकाणी व्हायरल न करण्यासाठी महिलेकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा  धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मधील रहाटणी येथील शिवराजनगर येथे गुरुवारी (दि.13) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर वाकड पोलीस ठाण्यात खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीव पटेल उर्फ राजीव परमार (रा. मगरपट्टा पूर्ण पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 34 वर्षाच्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रहाटणी येथील शिवराजनगर येथे वास्तव्यास आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेच्या शरीरसंबंधाचे व्हिडीओ बनवले. ते व्हिडीओ महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवले. ते व्हिडीओ बाहेर इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारानंतर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.