ऐका हो ऐका; शहरातील रेशनधारकांना आधारकार्ड लिंकसाठी १५ दिवसांची मुदत…

पिंपरी चिंचवड : रेशनिंगकार्डवर धान्य घेणाऱ्या नागरिकांना आधारकार्ड संलग्न करण्यासाठी येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कुटुंबातील सर्व व्यक्‍तींचे आधारकार्ड व एका सदस्याचा वैध मोबाईल क्रमांक संलग्न न केल्यास फेब्रुवारी महिन्यापासून धान्य मिळणार नसल्याचे निगडी परिमंडल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत अ विभागाअंतर्गत एकूण १२० रेशनिंग दुकानदार असून, ४० हजार रेशनिंगकार्डधारक जोडले आहेत. ज विभागात ८२ दुकानांमधून ३८ हजार रेशनिंगकार्डधारकांना धान्य दिले जाते, तर फ विभागात सर्वाधिक १२५ रेशनिंगदुकाने असून ४५ हजार रेशनिंग कार्डधारकांना धान्य दिले जाते. या सर्व रेशनिंगकार्डधारक लाभार्थ्यांचे अधारकार्ड रेशनिंगकार्डला संलग्न असने बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय या कुटुंबातील एका सदस्याचा वैध मोबाईल क्रमांक देखलि संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्‍यांचे आधार, मोबाईल लिंक करणे आवश्‍यक आहे. याकरीता रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करुन आधार आणि मोबाईल क्रमांक लिंकचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. याकरित 31 जानेवारीपूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमधील लाभार्थ्‍यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक देण्‍याच्‍या उद्दीष्‍टाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे. त्‍याअनुषंगाने धान्‍याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्‍दारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्‍यात येणार आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.