गाडीतून तस्करी करून अंमली पदार्थ विक्री करणारा आरोपी पोलिसाचा जाळ्यात,१७.२०० किलो वजनाचा अफु जप्त

पुणे : गाडीतून तस्करी करून (अफु) हा अंमली पदार्थ विक्री करणा-या एकाला भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पकडण्यात आले.याप्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १७ किलो २०० ग्रॅम वजनाचा अफुची बोंडे(दोडा चुरा) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

महिपाल गणपत विष्णोई (वय-३० रा. साई हाईट्स, हरपळे वस्ती, फुरसुंगी,मुळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिष्णोई राजस्थानातून अफू विक्रीस घेऊन होंडा सिटी गाडीतून कात्रज चौकातून निघाला होता. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस कात्रज चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी संशय आल्याने

त्यांनी आरोपीची गाडी थांबवली. गाडीची डिक्कीची पाहणी करण्यात असता डिक्कीतील एका पोत्यात अफुची बोंडे (दोडा चुरा), पाने सापडली.या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत १७ किलो २०० ग्रॅम वजनाचा अफुची बोंडे (दोडा चुरा) हा अंमली पदार्थ जप्त करुन त्याचेवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३/२०२१ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),१७ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन नमुद आरोपी याला गुन्हयात अटक केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास ,वैभव गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक,भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई सागर पाटील , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर, सर्जेराव बाबर, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगटे विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,  अर्जुन बोत्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे),भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक, नितीन शिंदे, तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, संतोष भापकर, निलेश खोमणे, सोमनाथ सुतार,समिर बागसीराज, हर्षल शिंदे, राजु वेंगरे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत व तुळशीराम टेभुर्णे यांनी कारवाई केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.