चिंचवड पोलीस स्टेशन व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम ; ६५ बेवारस वाहनांच्या मालकांचा लागला शोध
पिंपरी चिंचवड : चिंचवड पोलीस ठाणे आवरातील वर्षानुवर्षे धुळ l खात पडलेली बेवारस व विविध गुन्हयातील जप्त वाहने त्यांचे मुळ मालकांचा शोध घेवुन ती वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्त यांनी दिले होते. त्याअषंगाने चिंचवड पोलीस स्टेशनचे आवरातील अनेक वर्षे धुळ खात पडलेल्या दुचाकी वाहनांचे चासी नंबर व इंजीन नंबर वरुन एकुण ६५ वाहनांचे मुळ मालकांचा शोध गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी लावला असून ती वाहने तात्काळ मालकांना देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप- आयुक्त मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त सागर कवड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस ठाण्याच्या आवारात मालकांच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या ६५ वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, शिवाजी जव्हेरी यांना यश आले आहे.
सदर शोध लागलेल्या वाहनांचे मालकांनी आपली वाहने ओळख पटवुन व पुरावे देवुन, परत घेवुन जाण्याचे अवाहान पोलीसांनी केले आहे. चिंचवड पोलीस स्टेशन आवरात शोध लागलेल्या एकुण ६५ वाहनांचे नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चासी नंबर, इंजीन नंबर, वाहन मालकाचे नाव व पत्ता याची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहे सदर यादी मध्ये आपले वाहन/नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवुन, आपले वाहन घेवुन जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विवीध गुन्हयात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळुन येत नसल्याने सदर वाहने पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडुन आहेत त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर बकाल व विचीत्र दिसुन येतो. त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवुन चिंचवड पोलीस स्टेशन ने बेवारस वाहनांचे मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला.
गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने सदर शोध लागलेल्या एकुण ६५ मालकांशी संपर्क साधला जाणार आहे. शोध लागलेल्या वाहनांचे मालकांनी त्यांची वाहने तात्काळ चिंचवड पोलीस स्टेशन येथुन वाहनाची कागदपत्रे, स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र दाखवुन घेवुन जावीत, सदरची वाहने घेवुन न गेल्यास, ती बेवारस समजुन, कायदेशीर प्रकीया पुर्ण करुन सदर वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येईल असे चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकर काटे यांनी सांगीतले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!