जागे संबधावरुन झालेल्या वादात महिलेचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : जागे संबधावरुन झालेल्या वादात महिलेचा विनयभंग झाल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश गुलाब काटे (वय 42, रा. दापोडी), राजेंद्र गुलाब काटे (वय 50, रा. सांगवी), अक्षय राजेंद्र काटेे (वय 25, रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेच्या वादातून आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. फिर्यादी याठिकाणी गेल्या असता त्यांना अक्षय काटे या आरोपीने मागून धक्का देऊन खाली पाडले. महिला खाली कोसळल्यानंतर आरोपी महेश काटे याने ‘तुझी आता इज्जत काढतो’ असे म्हणत, फिर्यादी महिलेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिखरे अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.