श्वाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर द्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर : मर्यादित नैसर्गिक स्त्रोतांचा सध्या अमर्यादित वापर होत आहे. वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही इंधनाच्या वापरात वाढ दर्शवते. शाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर देण्यात यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. संरक्षण क्षमता महोत्सवाचे (सक्षम) त्यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन येथे डिजिटल उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

भारत पेट्रोलीयम, गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया, (गेल), इंडियन ऑईल कॉपोरेशन, या इंधन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्याकडून संयुक्तरीत्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हरित व स्वच्छ ऊर्जा या संकेल्पनेवर आधारित ‘सक्षम’ अभियानात 15 फेब्रुवारीपर्यत ‘सक्षम’ अतंर्गत इंधन बचतीवर व स्वच्छ पर्यावरणासाठी जनजागृती होणार आहे.

पेट्रोलियम व वायु इंधनासोबतच सौरऊर्जा, पवन उर्जेच्या वापरासाठी लोकांना प्रेरीत करण्याची गरज असल्याचे राज्यपाल म्हणाले.

 

भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवि, गॅस ॲथॅारिटी ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक गौतम प्रसाद, इंडियन ऑईल कॉपोरेशनचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी यावेळी विचार व्यक्त केले. तेल उद्योग महाराष्ट्राचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सुत्रसंचलन श्रीमती निलिमा यांनी तर आभार श्री.कृष्णमुर्ती यांनी मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.