अफवा पसरवू नका, ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही
नागपूर : बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होत नाही. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंर्वधन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधबडे, सचिव डॉ. गजानन वानखेडे, सहसचिव हुसेन शेख, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र राऊत, तसेच शेतकरी प्रतिनिधी डॉ. पिंकी इंगेवार, प्रेमचंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.
बर्ड फ्लू विषाणूची बाधा मानवाला होत नाही. यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करताना भीती बाळगू नका. कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा जोडधंदा आहे. चिकन तसेच अंडी यामध्ये कोणतीही भेसळ राहत नाही. शिवाय यामध्ये मोठया प्रमाणात प्रथिने असतात. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्याला रोख बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे करा
पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य व्हिलेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पूर्ण शिजवलेले मांस खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तला असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.
हे करू नका
कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!