कोरेगाव पार्कमधील मसाज पार्लरकडुन हप्त्याची मागणी करणाऱ्या नकली पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे;स्पा सेंटर सुरू ठेवायचे असल्यास प्रतिमहा १५ हजार रुपयांची खंडणी हप्ता स्वरूपात मागणाऱ्या व मारहाणीची धमकी देणाऱ्या पोलिस प्रवाह न्यूजच्या एका पत्रकारासह तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

विशाल कचरू पायाळ (वय २८, रा. कदम वाकवस्ती, लोणी काळभोर), सनी तानाजी ताकपेरे (वय २७, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल पायाळ हा पोलिस प्रवाह न्यूजचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. त्याचा साथीदार पंकेश राजू जाधव यालाही अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगेश हे. कोरेगाव पार्कमधील स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. स्पा सेंटरच्या मालकीन नूतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या असून १६ जानेवारी रोजी त्यांच्या स्पामध्ये दोघे जण आले व त्यांनी स्काइन स्पा चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, तेव्हा धवनयांनीत्याला नकार दिला. त्याने माझे परवानगीशिवाय स्पा चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा १५ हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल अशी धमकी देत माणसे पांठवून मारण्याचीही धमकी दिली. सोमवारी त्याने फोन करून आज दुपारी पैसे घेण्यासाठी

याप्रकरणी मंगेश डोंगरखोस (वय येतो, असे सांगितले. या प्रकाराची त्यांनी ३१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.