मोबाईल क्रमांक आधारशी असा करा लिंक, अशी आहे प्रोसेस

मुंबई : आधार कार्ड अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. सरकारी कामांसाठी, सरकारी योजनांसाठी, बँक, घर-वाहन खरेदी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. आधारसंबंधी कोणतीही माहिती व्यक्तीच्या फोन नंबरवर, ओटीपीद्वारे पाठवली जाते. परंतु मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर असेल तरच ओटीपी फोनवर येतो. अशात फोन नंबर बदलल्यास किंवा फोन हरवल्यास पुन्हा सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर आधारशी लिंक करता येऊ शकतो.

पण, यासाठी तुम्हाला आधारच्या एनरोलमेंट/अपडेट सेंटरला जावे लागेल. या प्रक्रियेसाठी जवळपास 90 दिवसांचा वेळ जाऊ शकतो. पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचा नंबर रेजिस्टर करु शकता.

-सर्वात आधी तुम्हाला आधार एनरोलमेंट/ अपडेट सेंटरला जावं लागेल

-त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरावा लागेल

-ज्या क्रमांकला आधारशी जोडायचा आहे, तो फॉर्ममध्ये भरा आणि जमा करा

-प्रमाणीकरणासाठी तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स द्यावे लागेल

-त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल

-या पावतीमध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर (URN) मिलेल

-URN चा वापर करुन तुम्ही आपले अपडेशन स्टेटस चेक करु शकता

-आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवे आधारकार्ड घेण्याची गरज नाही

-जेव्हा मोबाईल क्रमांक आधारसोबत रजिस्टर होईल, त्यानंतर तुम्हाला आधारचे ओटीपी येणे सुरु होतील

-जर तुम्हाला आधारचे अपडेट स्टेटल पाहायचं असेल तर तुम्ही  UIDAI चा टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करुन जाणू शकता

-आधारकार्डशी मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एनरोलमेंट/अपडेट केंद्रावर 25 रुपये द्यावे लागतील. मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला अन्य कोणतेही कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. फक्त तुम्हाला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल.

1 reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.