अनाथ अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : अनाथ अल्पवयीन मुलीला वाममार्गाला लावत तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

याप्रकरणी तृतीयपंथी महादेव उर्फ भारती कोळी आणि माया महादेव उर्फ आरती काळे (दोघेही कलवड जकात नाक्याजवळ, धानोरी) यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद
दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या आई वडिलांचे निधन झाले असून ती एका ओळखीच्या महिलेसोबत लोहगाव परिसरात वास्तव्यास आहे. जानेवारी २०२० मध्ये तिची वरील आरोपींची ओळख झाली होती.आरोपींनी या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्याकडून वारंवार वेश्याव्यवसाय करून घेतला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह केला. यादरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि ती ९ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.