अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचां छापा

पिंपरी चिंचवड : अवैधरित्या दारु व बिअरची विक्री करणा-या शेतकरी फॅमिली रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉजिंग हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून हॉटेल चालक, मॅनेजर  यांच्याविरुध्द दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून  रोख रक्कम, ४ मोबाईल व देशी-विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बॉटल असा एकूण ७२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मॅनेजर पवन श्रीरामायण दुबे (वय २३ रा. शेतकरी फॅमिली रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉजिंग हॉटेल, चोवीसावाडी,च-होली पुणे ), सागर नरसींग पतंगे (वय २३ रा. सदर), कृष्णा धनराज बसुळे (वय २२ रा. सदर), हॉटेल -चालक संजय पंडीबा पवळे (४२ रा.ए,१/३०५ शामा इस्टेट,च-होली फाटा,पुणे आळंदी रोड पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस दिघी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की,शेतकरी फॅमिली रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉजिंग या हॉटेलमध्ये दारू विक्री करण्याचा कोणताही शासकिय परवाना नसतांना हॉटेलमध्ये गि-हाईकांना बसवून त्यांना देशी विदेशी दारूची व बिअरची विक्री  विक्री करीत आहे.त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून ९५८० रोख रक्कम, ४ मोबाईल व देशी-विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बॉटल असा एकूण ७२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.