कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग
पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे.BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली असून घटनास्थळी अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या दहा अग्निशामन दलाच्या गाड्या सीरममध्ये दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारी २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे.
इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली
आग विझवायला साधारण एक ते दीड तास आणखी लागेल, अशी माहिती समोर येते आहे. ज्याठिकाणी लशीची निर्मिती केली जाते त्या बाजूला फारसं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!