ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि व्हिडीओ गेम पार्लरवर पिंपरी पोलिसांनी छापा,25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : चिंचवड स्टेशनच्या समोर असलेल्या गवळीवाड्यात सुरु असलेल्या तीन ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि दोन व्हिडीओ गेम पार्लरवर पिंपरी पोलिसांनी छापा मारून 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 2 लाख 84 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 25 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील 22 जणांना अटकपूर्व जामिनावर सोडण्यात आले आहेत. तर तीनजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,चिंचवड स्टेशनच्या समोर शिवाजी चौकात गवळी वाडा येथील एमबी क्लासिक बिल्डिंगमध्ये भाग्यश्री ऑनलाईन लॉटरी, जय महाराष्ट्र व्हिडीओ गेम, ओम व्हिडीओ गेम, राजश्री ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि राजू लॉटरी सेंटर येथे ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पिंपरी पोलिसांनी पाच दुकानांवर छापे मारले. या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगाराची साधने आणि पैसे असे एकूण 2 लाख 84 हजार 230 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे

जुगार खेळणारांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5, महारसाहत्र लॉटरी (नियंत्रण व कर आकारणी) कायदा 1958 कलम 4, साथीचा रोग अधिनियम 1897 कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.