पत्नी आणि सासरच्यां त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवड : जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून पतीचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पत्नी, सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 2 जानेवारी 2019 पासून 13 डिसेंबर 2020 या कालावधीत सहकार नगर, ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडला

मनोज राजेंद्र पाटील असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून पत्नी रोशनी पाटील, सासू बेबाबाई हिरालाल पाटील, मेहुणा मयूर हिरालाल पाटील (सर्व रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र मिठाराम पाटील (वय 58, रा. भिलाली, ता. पारोळा, जि. जळगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनोज यांच्या नावावर असलेली जमीन आरोपी पत्नी रोशनी हिच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुणा यांनी मनोज यांचा मानसिक छळ केला. त्या छळाला कंटाळून मनोज यांनी काळेवाडी येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत 20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.