बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करणार असल्याची तरुणीची फेसबुक पोस्ट,दामिणी पथकाच्या प्रयत्नांना यश

पुणे; पुण्यातील तरुणीला नोकरी नसल्यामुळे मानसिक तणावाखाली आल्याने आत्महत्या करणाऱ्या तरुणीला महीला सहाय्यक कक्ष गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने वाचविले.

मा.पोलीस उप-आयुक्त यांना फेसबुक वर एक पोस्ट आली असून,एक मुलगी वय ३० वर्ष ही आत्महत्या करणार आहे.मा.पोलीस उप-आयुक्त यांनी मुलीचा फोन नंबर व राहण्याचा पत्ता मिळवुण तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तीचा फोन बंद येत होता.दामिनी मार्शल यांनी सदरच्या पत्त्याचा तात्काळ शोध घेत तरूणीच्या घरी चौकशी केली असता, ती घरातुन सकाळी ९.०० वा बाहेर गेलेली आहे.दामिनी मार्शल यांनी त्या मुलीच्या घरच्यांच्या मदतीने व तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन करुन त्यांच्या मदतीने तिचा शोध घेतल्यानंतर ती मुलगी मिळून आली, तेंव्हा त्या मुलीला ताब्यात घेवुन कोथरुड पोलीस स्टेशन येथे हजर केले व त्या मुलीकडे सखोल चौकशी केली असता त्या मुलीने सांगितले की,नोकरी नसल्यामुळे मानसिक खच्चीकरण झाले व त्यामुळे मी आत्महत्या करणार होते.दामिनी मार्शल यांनी त्या मुलीचे समुपदेशन केले व तिचे मनःपरिवर्तन केले.व त्या मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरुप दिले.मुलीच्या पालकांनी दामिनी मार्शल यांचे आभार मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.