माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे प्रकरणातील आरोपींना आश्रय व इतर सहाय्य केल्या प्रकरणी ३ आश्रयदात्यांना अटक

हडपसर; बहुचर्चित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण ब-हाटे व त्याचे साथीदार यांच्याविरुध्द पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल असताना देखील आरोपींना आश्रय दिला व मदत केली,अश्रयतांवर गुन्हा दाखल व ७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे तसेच ५ लाख रूपये दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

१) शंकर शेमटया वसावे (वय-२८) रा- जिल्हा परिषद शाळेजवळ, मु.काकरपाटी, पोस्ट- सिसा, ता-धडगाव, जि-नंदुरबार २) संदीप पोपट घाडगे, (वय-३४) ,रा- वैष्णवी बंगला, प्लॉट नंबर ८, लाखानगर, यशवंतनगर, वाई, जि-सातारा ३) सूरज सिध्देश्वर गायकवाड, (वय-२६) रा- भाडळेमळा, सोनारपूल, मु.पो.फुरसुंगी, पुणे अशी आरोपींना आश्रय दिलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांना मोका कायद्यानुसार अटक करण्यासाठी पोलीस शोधत असल्याची व आरोपी हे अटक चुकविण्यासाठी फरार होऊन आपले अस्तित्व लपवत आहेत या सर्व बाबींचे ज्ञान व माहिती या नव्याने अटक केलेल्या आरोपींना असून त्यांनी आरोपींना आश्रय दिला व मदत केली.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये अटक केली असून रिमांडकामी श्री. अ.य.थत्ते, विशेष मोका न्यायाधीश यांचे न्यायालयात हजर केले असता ७ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. मोक्यातील आरोपींच्या आश्रयदात्यांना गुन्ह्याच्या शाबीतीनंतर ५ वर्षापेक्षा कमी नसेल अशा कारावासाची तसेच जन्मठेपेची तसेच किमान ५ लाख रूपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.मोक्का अधिनियमातील या तरतुदीचा वापर विशेष परिस्थितीत करण्यात आला आहे.आश्रय दिलेल्या आरोपींवर हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक १३८०/२०२० भा.दं.वि. कलम ३४७, ३८५, ३८६, ३८७, ५०४, ५०६, १२० (ब) महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ (१) (जी) (आर) (एस), ३ (२) (V), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये दिनांक २-९-२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच दिनांक १०-१०-२०२० रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२),३ (४) ही कलमे समाविष्ट करण्यात आली होती.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त, रवींद्र शिसवे यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख(गुन्हे १) सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (गुन्हे २) यांनी केलीआहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.