लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने वरसोली येथे रस्ता सुरक्षा अभियान

लोणावळा (नवनाथ आढाव): लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने वरसोली टोल नाका येथे जुन्या पुणे मुबई महामार्गवर ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरवात करण्यात आली.लोणावळा उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनीत कावत, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, तसेच पो स ई अनिल लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी दुचाकीवर हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीस स्टेशनच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विना हेल्मेट दुचाकीस्वरांना हेल्मेट विषयाची माहिती देऊन हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात आले व त्यांना हेल्मेट परिधान करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी दुर्गा जाधव, बनसोडे , अमित ठोसर, मुलाणी , व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.