अवैधरित्या गुटख्याची साठवणुक करुन विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर पोलिसाचा छापा
पिंपरी चिंचवड : अवैधरित्या गुटख्याची साठवणुक करुन विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीसांनी छापा टाकत २ लाख ६० हजार ९९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
भवरलाल नारायणलाल चौधरी (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरूद्ध चिंचवड पोलीस स्टेशन ३२८.२७२,२७३.१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे येथे पुरबाजी नावाच्या किराणा दुकानामध्ये अवैधपणे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनीी छापा टाकला असता किराणा दुकानात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ आढळून आला.पोलिसांनी दुकानातून १७ हजार ८४५ रोख रक्कम, २ लाख ४३ हजार १४९ रुपये किमतीचा गुटका व तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण २ लाख ६० हजार ९९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!