गरोदर महिलेला प्रेमसंबंध असल्याचे सांगत विनयभंग, तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : गरोदर महिलेला प्रेमसंबंध असल्याचे सांगत तिच्याशी गैरवर्तन करणा-या एका तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार बुधवारी (दि. 20) दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथील एका सोसायटीमध्ये घडला.

सुदर्शन चंद्रकांत संकपाळ (वय 26, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित गरोदर महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या घरी दुपारच्या वेळी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी बेकायदेशीरपणे तिच्या घरात आला. महिलेचा हात धरून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत त्याने गैरवर्तन केले. पीडित महिला गरोदर आहे. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.