बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी  पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा 30 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जेसन जॉन डिकोना (वय २४ रा.संघमित्रा हौसिंग सोसायटी
बिल्डींग नंबर २२ रुम नंबर २१४ निगडी पुुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे, फरारी, तडीपार आरोपी व गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची माहिती घेत पेट्रोलिंग करीत फिरत असताना, दुर्गामाता चौक निगडी पुणे येथे आले असता त्याना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार जेसन डिकोना हा निगडी ओटास्किम स्मशानभुमी समोरील रोडवर येथे थांबलेला असुन त्याच्या जवळ पिस्टल सारखे हत्यार आहे. त्यानुसार पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार जेसन डिकोना हा कोणाची तरी वाट पाहत थांबलेला दिसला, तो पळुन जाणार नाही याची खबरदारी घेवुन पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा 30 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी जेसन जॉन डिकोना हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर १) १३९/२०१७ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७(१)(३) सह १३५ २) ४६०/२०१८ महाराष्ट्र जुगार कलम १२(अ) अन्वये गुन्हे नोंद आहेत.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त  सुधीर हिरेमठ , सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप-निरीक्षक शाकीर जिनेडी, तसेच पोलीस अंमलदार गणेश हजारे, अशोक दुधवणे, सुनिल कानगुडे, संदीप पाटील, शकुर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस ,अशोक गारगोटे व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.