विनापरवाना अवैधरित्या दारु विक्री करणा-या एस.पी. फॅमिली रेस्टॉरंटवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा
पिंपरी चिंचवड : विनापरवाना अवैधरित्या दारु विक्री करणा-या एस.पी. फॅमिली रेस्टॉरंटवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून २ जणाविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७१ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजित लल्लन सिंग (वय २८ रा. एस. पी. फॅमिली रेस्टॉरंट कासारसाई. पुणे. मुळगांव मलवडा ता. मलवडा जि. सारंग राज्य बिहार) व इतर ०२ व्यक्ती विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरूवारी ( दि. २१) रोजी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की,हिंजवडी ते कासारसाई येथील डांबरी रोड लगत असलेल्या एस.पी. फॅमिली रेस्टॉरंटमध्ये विनापरवाना दारुची विक्री होत आहे.त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारलाा . त्यामध्ये आरोपी ग्राहकांना दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून ३ हजार ५९५ रोख रक्कम, ५० हजार किमतीचे ३ अँड्रॉइड मोबाईल, १८ हजार १८४ रुपये किमतीच्या वेगवेगळया कपनीच्या देशी विदेशी दारुच्या व बिअरच्या बाटल्या असा एकूण ७१ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!