एटीएम सेंटरवर दरोड्याच्या तयारीत आली होती टोळी; इतक्यात…
पिंपरी चिंचवड : युनियन बँकेचे एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना खंडणी, दरोडा विरोधी पथकाने अटक केली तर अन्य तिघे पसार आले.ही कारवाई शनिवारी (दि.23) भोसरी येथील इंद्रायणीनगर परिसरात करण्यात आली.
सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 32, रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) व जितसिंग राजपालसिंग टाक (वय 26, रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर संतोष काळे (रा.रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे), अमरसिंग जगरसिंग टाक (रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) व सनीसिंग पापासिंग दुधाणी (रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) पसार झाले. या सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी इंद्रायणीनगर, भोसरी येथील युनियन बँकेचे एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी कारमध्ये ( एमएच 12/ डीएस 2605) 2 लाख 6 हजार 600 रूपये किंमतीचे दोन बोअर कटर, दोन स्क्रु ड्रायव्हर, दोरी, दोन कोयते आदी साहित्य दरोडा टाकण्यासाठी जवळ बाळगले होते. दरोडा विरोधी पथकाने छापा मारुन पाचपैकी दोघांना ताब्यात घेत अटक केली. तर अन्य पसार
झाले. पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक मंगेश भांगे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!