खळबळजनक ! ट्रॅक्टर रॅलीत 4 शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट, संशयित आरोपी अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात सध्या सरकार आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे. शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर आणले. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता.

पकडण्यात आलेल्या या इसमाने पोलिसांवर गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांनी त्याला माध्यमांसमोर ठेवले ज्यात त्याने म्हटले, ‘आमचा असा बेत होता की 26 तारखेला जेव्हा ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा जी पहिली फळी असेल आणि जेव्हा दिल्ली पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा गोळ्या चालवल्या जातील. जर ते थांबले नाहीत तर आम्हाला गोळीबार करण्याचे आदेश आहेत. मागून जी आमची टीम असेल ती गोळीबार करेल ज्यात 8-10 जण आहेत. लोकांना वाटेल की दिल्लीत शेतकऱ्यांनी गोळ्या चालवल्या आहेत. 26 तारखेच्या रॅलीत अर्धे लोक हे पोलिसांचे असतील जे जमावाला पांगवण्यास मदत करतील

यावेळी संशयित शूटरने सांगितले, ‘व्यासपीठावर जे चार लोक असतील ज्यांचे फोटो दिलेले आहेत त्यांना गोळ्या मारण्याचा बेत आहे. जो आम्हाला शिकवतो तो प्रदीप सिंह हा राई (हरियाणा) ठाण्याचा एसएचओ आहे. त्याला आम्ही कधीही पाहिलेले नाही, तो येतो तेव्हा चेहरा झाकून येतो. त्याचा बॅच आम्ही पाहिला आहे.’

चार शेतकरी नेत्यांची गोळ्या मारून हत्या करण्याच्या कटाचा खुलासा झाल्यानंतर या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. शेतकरी नेते कुलवंत सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, या यंत्रणा शेतकरी आंदोलनाची छबी खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.