रेणू शर्माप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले,…

नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती या प्रकरणी आता खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रेणू शर्मा यांना राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, असा खळबळजनक दावा देशमुख यांनी केला आहे.

रेणू शर्मा हे प्रकरण संपले आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले होते, त्याबाबतही रेणू शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन तक्रार मागे घेतली होती. यावेळी तक्रार मागे घेताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याचाच आधार घेत अनिल देशमुख यांनी वरील वक्तव्य केले.

‘रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. राजकीय दबावापोटी तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचे वक्तव्य रेणू शर्मा यांनी केलेले आहे. हा विषय आता संपला आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, या सगळ्याबद्दल रेणू शर्मा यांनी सांगितले आहे,’ असे देशमुख म्हणाले.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहमतीच्या संबंधाचा खुलासा केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहीण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी अस्वस्थ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.