खळबळजनक ! कोंढाव्यात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणावर गोळीबार

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील खडीमशीन चौकात राहणाऱ्या एका तरुणावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या गोळीबारात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिग्नेश गोरे (वय 19, रा. खडी मशीन, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश याच्या मित्रांचे आरोपींसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. यातून हा गोळीबार झाला आहे. मात्र, जिग्नेश याचा या वादशी काही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास जिग्नेश हा त्याच्या घराजवळ थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जिग्नेशच्या दिशेने गोळी झाडली. मांडीला चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. जिग्नेशच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गोळीबार केला का त्याची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिग्नेशच्या मित्राचे ताब्यात घेतलेल्या आरोपी सोबत भांडण झाले होते. त्या वादातून हा प्रकार झाला का याचाही तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.