चक्क डॉक्टर पतीकडुन दुसरी ही मुलगीच झाली म्हणून पत्नीस बेदम मारहाण

बीड; मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी संपलेला दिसत नाही. दुसरी ही मुलगीच झाली म्हणून डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली.जखमी महिलेस बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रियंका विशाल घुगे (रा. कळंब) या महिलेला दुसरी मुलगीच झाली. मुलगीच झाल्याचे कारण पुढे करत तिचा पती विशाल घुगे याने रात्री प्रियंका हिला बेदमपणे मारहाण केली. प्रियंका हिचे माहेर बीड असल्याने तिने आपल्या घरच्यांना ही माहिती सांगितल्याने जखमी महिलेस बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून.या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.सखोल चौकशी केली असता सदरील महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचाही प्रयत्न केला असल्याचेही सांगण्यात आले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.