बस चालू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी ; चंदगड भाजपा विद्यार्थी युवा मोर्चाकडून तहसीलदार व परिवार महामंडळला देण्यात आले निवेदन
चंदगड( ज्ञानेश्वर पाटील) : कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाने सर्व ठिकाणी शाळा, कॉलेज बंद केली होती.यादरम्यान सर्वत्र एस.टी महामंडळची वाहतूकही बंद ठेवली होती.पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वत्र हळूहळू शाळा, कॉलेज सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहें.तसेच सर्वत्र एस.टी,बसेस पुन्हा एकदा सुरू केल्या आहेत.असे असताना चंदगड तालुक्यातील खेड्यातील मुलांना कॉलेज व शाळांना येताना परिवहन विभागाच्या काही ठिकाणी एस.टी पूर्ववत चालू नसल्याने अडचणी येतं आहेत.
चंदगड तालुक्यात काही गावामध्ये सकाळी येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या एस.टी, बसेस चालू नसल्याने मुलांची शाळा,कॉलेजला येताना गैरसोय होत आहें.काही गावातील मुले तर पायपीट करत शाळा, कॉलेजला येतात.तर काही डोंगरी भागातून मुलांना येताना रानटी प्राण्यांची भीती वाटू लागल्याने हा विषय चर्चेचा बनला आहें.
त्यासाठी चंदगड परिवहन महामंडळाने लवकरात लवकर एस.टी,बसेस चालू करून हा विषय मार्गी लावावा यासाठी भाजपा विद्यार्थी युवा मोर्चाकडून निवेदन देण्यात आले आहें.यावेळी भाजपा विद्यार्थी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम पेडणेकर,विशाल गावडे,निखिल शिंदे,सतीश गवस,लखन गावडे,राजेश चौकुळकर,शैलेश पेडणेकर,विनोद गावडे,जगदीश पाटील,अनिकेत सावंतसह आदी विद्यार्थी उपस्थित होतें.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!