विनापरवाना व बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या  १९ वर्षीय तरुणाला अटक

शिरूर : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या  १९ वर्षीय तरुणाला पुणे ग्रामीण एलसीबी शाखेच्या पोलीसांनी हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा मोबाइलसह एकुण छपन्न हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

महमद अलीहुसेन खान (वय १९ रा. सोरतापवाडी, इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाचे मागे, ता.हवेली जि.पुणे मूळ रा.पुरेखुदावन्द, रस्तामऊ, पोस्ट मंगरौली, जि.अमेटी, राज्य-उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर एक तरुण विनापरवाना व बेकायदेशीर पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव कमरेला बाळगलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा मोबाइलसह एकुण छपन्न हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सफौ. दत्तात्रय गिरमकर, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, पोकॉ. अक्षय जावळे यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.