शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ, पतीवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 3 जानेवारी 2021 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत रायगड मधील अलिबाग आणि खेड तालुक्यातील बहुळ येथे घडला

समाधान बबन पानसरे (रा. बहुळ, ता.खेड) असे गुन्हा दाखल झेलल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला लग्नात घातलेला सोन्याचा हार आणि स्त्रीधन म्हणून घातलेले मंगळसूत्र गहाण ठेवण्यासाठी पती समाधान यांनी मागितले. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. त्यावरुन आणि विवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन समाधान याने वारंवार शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.