घरातील साउंड सिस्टीमचा आवाज बंद करण्यास सांगितल्यावरून सख्खा भावावरच सुरीने वार

तळेगाव दाभाडे : घरातील साउंड सिस्टीमचा आवाज बंद करण्यास सांगितल्यावरून सख्खा भावावरच सुरीने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडी येथे घडली. याप्रकरणी भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट सोपान दाभाडे (वय 40, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत संजय सोपान दाभाडे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोपट आणि फिर्यादी संजय हे भाऊ आहेत. पोपट याने त्याच्या घरातील साउंड सिस्टीमचा आवाज मोठा केला. त्यामुळे फिर्यादी संजय यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून पोपट याने संजय यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुरीने संजय यांच्या मानेवर व डोक्यावर मारून जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.