अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या कराची हॉटेलवर पोलिसाचा छापा, तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : अवैधरित्या देशी, विदेशी आणि बिअर दारूची विक्री करणा-या कराची व्हेज नॉनव्हेज बिर्याणी हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून तीन जनावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सार्थक राजेश लालवाणी (वय २१ रा. पंचवटी अपार्टमेंट, फ्लॅट नं. ६. हेमुकलाणी गार्डन, पिंपरी, पुणेे) व इतर २ व्यक्ती विरोधात वाकडं पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांना माहिती मिळाली की,पिंपळे सौदागर मधील कराची व्हेज नॉनव्हेज बिर्याणी या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू, बिअरची विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी कराची हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून ७ हजार ७४० रुपये रोख रक्कम, ५३ हजार ४१५ रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बॉटल, १ लाख १९ ५०० रुपये किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सपोफी विजय कांबळे, पोहवा अनंत यादव, पोहवा संदीप गवारी, शिरसाठ, लोंढे, गोरे, शशिकांत पवार, भगवंता मुठे, महेश बारकुले, दिपक सावळे, गणेश कारोटे, अमोल शिंदे, महाजन, करचुंडे, योगेश तिडके, जाधव, माने व योगिनी कचरे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!