गुगलमध्ये एचआर एक्सिक्युटीव्ह असणाऱ्या तरुणीची आत्महत्या, की…?; मृत्यूभोवतीचं गूढ वाढलं

नवी दिल्ली : गुगलमध्ये एचआर एक्सिक्युटीव्ह असणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील मयूर विहार येथे समोर आला आहे. याबाबत परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांनी स्वातीच्या भावाला ही माहिती दिली. घाबरलेल्या स्थितीत स्वातीचा भाऊ अनिरुद्ध दिल्लीत आला असून, तो बहिणीच्या मृत्यूचा न्याय मिळवू इच्छित आहे.

अनिरुद्ध शर्माने शनिवारी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी अजूनही गुन्हा नोंद केला नाही. अनिरुद्धने केलेल्या आरोपानुसार, हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी स्वाती शर्माची हत्या केली. तथापि, पोलिसांनी सांगितले की, स्वातीने घरी आत्महत्या केली आहे. पूर्व दिल्लीच्या एसडीएम असलेल्या अनिरुद्ध शर्मा यांचा जबाब नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की,मृत स्वाती शर्मा सिंगापूरच्या गुगल कंपनीमध्ये एचआर पदावर काम करत होती. २०१९ साली मऊ जिल्ह्यात राहणारी हर्षवर्धन त्रिपाठीसोबत स्वातीचा प्रेमविवाह झाला. हर्षवर्धनच्या आईवडिलांचा या लग्नास विरोध होता. लग्नानंतर स्वाती नवऱ्यासोबत सिंगापूरला गेली होती. तेथे दोघांत भांडण होऊ लागले. स्वातीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, सासरची मंडळी स्वातीवर दिल्लीत फ्लॅट खरेदी करून देण्यासाठी दबाव आणत होते.

 

दरम्यान, हर्ष यूपीएससीची परीक्षा देण्याचा बहाणा करून सिंगापूरहून एकटा दिल्लीला आला आणि मयूर विहारमध्ये राहू लागला. दिवाळीला स्वाती देखील सिंगापूरहून दिल्लीला आली आणि पतीसोबत सासू – सासऱ्यांसोबत राहू लागली. दरम्यान स्वाती वर्क फ्रॉम होम करत होती. स्वातीने भावाकडे तक्रार केली होती की, सासरची लोकं मारहाण करतात, तिला यातना देतात आणि हुंडा मागतात.  त्यातच १९ जानेवारी रोजी स्वातीच्या आत्महत्येची बातमी मिळाली. त्यामुळे सर्वजण हैराण झाले. अनिरुद्धने म्हटले की, स्वाती आत्महत्या करु शकत नाही, कारण गुगल कार्यालयातून तिने दुपारपर्यंत काम केल्याची माहिती मिळत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.