पिंपरीत अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पोलिसाचा छापा

पिंपरी चिंचवड : अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी छापा मारला त्यात पोलिसांनी १७ हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. तर, तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बौध्दनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २५) करण्यात आली.

गणेश रतन शिंदे (वय २६ रा. घर नंबर ३८६, बौध्दनगर, पिंपरी) व इतर ०२ आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्यां आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रिव्हर रोड पासून बौध्दनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला विजय स्टेशनरी अॅण्ड जनरल स्टोअर दुकानाच्या समोर, बिल्डींग नंबर १६ च्या पाठीमागे, बौध्दनगर येथे सार्वजनिक ठिकाणी उघडया जागेत  कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या जुगार अड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी २ हजार ४९० रुपये रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीचे मटका खेळण्यासाठी वापरलेले मोबाईल, १० रुपये किमतीचे कल्याण मटका साहित्य असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द एमआयडीसी पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुरनं १०/२०२१ भादंवि क १८८.२६९.३४ महाराष्ट्र जुगार अधिनीयम क १२ अ साथीचे रोग अधिनीयम १८९७ क ३. राष्ट्रीय आपत्ती अधिनीयम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास  पिंपरी पोलीस स्टेशन करीत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.