पोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, आबा चेमटे आदी उपस्थित होते. तसेच सायबेज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमित गुजवानी, व्यवस्थापक प्रिया पारनेकर उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी तसेच महिंद्रा कंपनीची नवीन नऊ स्कॉर्पिओ वाहने प्राप्त करुन दिली. ही वाहने एस्कॉर्ट व पायलट डयुटी करीता वापरण्यात येणार आहेत
.पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पाल्य यांना त्यांच्या कला, गुणांना वाव देता यावा, कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाकरीता पोलीस दलाची “पोलीस मनोरंजन केंद्र” ही इमारत 15 ऑगस्ट 1959 रोजी पुर्णत्वाला आली. त्यांनतर सन 2005 मध्ये इमारतीचे पहिल्या मजल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकरीता एकुण 6 विश्रांतीकक्ष तयार करण्यात आले.
सन 2020 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व सध्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस मनोरंजन केंद्राच्या इमारतीचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण व विस्तारीकरण करुन घेणे तसेच या वास्तुच्या बाजुला एक प्रशस्त हॉल तयार करण्याची संकल्पना मांडून ती पुर्णत्वास नेली. यासाठी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी विशेष प्रयत्न केले. सायबेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण नथानी व संचालक रितु नथानी यांनी सामाजिक बांधीलकीतून स्वेच्छेने “पोलीस मनोरंजन केंद्र” इमारतीचे वातानुकुलित यंत्रणेसह सर्व सोयी -सुविधांयुक्त नुतनीकरणासह विस्तारीकरण करण्यासाठी विशेष सहाय्य केले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!