आणखी एका अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या, ‘ती’ डिलीट केलेली पोस्ट दुर्दैवाने खरी ठरली!!

बेंगळुरू : गेल्यावर्षी जुलै महिन्यात जग सोडून जात असल्याची पोस्ट टाकून खळबळ उडवणारी अभिनेत्री जयश्री रामय्या हिने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत करत मृत्यूला कवटाळेच. डिप्रेशनसोबतचा तिचा लढा अखेर अपयशी ठरला. दीर्घकाळापासून डिप्रेशनशी लढत असलेल्या जयश्रीचा मृतदेह सोमवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

बेंगळुरू येथे एका आश्रमात जयश्रीने गळफास लावून आयुष्य संपवले. नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचे तसेच मेसेजला उत्तर देत नसल्याचे तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला. आश्रमातील लोकांनी तिच्या खोलीत जाऊन बघितले असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

बिग बॉस कन्नडच्या तिस-या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती.  अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही, यामुळे ती डिप्रेशनमध्येगेली होती.

24 जून 2020 रोजी या नैराश्यातूनच आपण आत्महत्या करणा असल्याचं तिने Facebook page वर लिहिलं. त्या वेळी कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला.

आश्रमाच्या लोकांनी तिच्या खोलीत प्रवेश केला, त्या वेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात आत्महत्येसंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूही अशाच प्रकारे झाला होता. 14 जून 2020 रोजी तो मुंबईत ब्रांद्याच्या त्याच्या फ्लॅटमध्ये फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूसंदर्भात अजूनही चौकशी आणि तपास सुरू आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.