केंद्राने शहाणपणा दाखवावा, अजूनही वेळ गेलेली नाही : शरद पवार

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली.“केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. अजूनही वेळ गेलेली नाही. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केलं

त्याचप्रमाणे, केंद्र सरकारला इशारा हा सूचक दिला आहे. गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आज (२६ जानेवारी) अचानक हिंसक वळण घेतले आहे. यासाठी कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न देशभरात उपस्थित होत असताना आता शरद पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारला इशारा देताना शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. अजूनही वेळ गेलेली नाही. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या. आपल्या बळाचा वापर करून एखादा निर्णय घेणे योग्य नाही. सरकारने बतशी मानसिकताही ठेवू नये. एकेकाळी अस्वस्थ असलेला आपण पाहिलेला पंजाब आपण कुठे सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये”, असे आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, “देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीतच सुरू आहे. चर्चा करायला हरकत होती? मी शेतकऱ्यांचे मोर्चे यापूर्वीही पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही मी पाहिला आहे. पण असा प्रकार पहिल्यांदाच झाले. इथे शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरविणे, पाकिस्तानी संबोधणे झेंड्यावरून वक्तव्य करणं हे यावेळी प्रथमच पाहिले. हा आततायीपणा आहे”, असे शरद पवार म्हणाले

म्हणून आंदोलन चिघळलं

गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत बसून त्यांचं म्हणणं मांडत आहेत. शेतकऱ्यांनी 60 दिवस संयम दाखवला ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका गेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता, असं त्यांनी सांगितलं. इतके दिवस संयमाने आंदोलन केल्यानंतर वेगळ्या मार्गाने म्हणणं मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला असावा. इतक्या दिवसानंतर संयमाने आंदोलन करणारे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकारने त्याकडे समंजसपणे पाहायला हवे होते. त्यांच्या रॅलीला येण्याजाण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. त्यांचे मार्ग आखून द्यायला हवे होते. 25 हजार ट्रॅक्टर रस्त्यावर उतरल्यावर काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना यायला हवा होता. पण पोलिसांनी जाचक अटी लादल्याने प्रतिकार झाला. वातावरण चिघळलं, असं सांगातनाच जे घडलं त्याचं समर्थन करता येणार नाही. पण ते का घडलंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही ते म्हणाले.

आघाडी सरकार सारखा संयम दाखवायला हवा होता

मुंबईतही काल सोमवारी हजारो शेतकरी आले. पण राज्य सरकारने संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे शेतकरी शांतपणे आले आणि शांतपणे गेले. राज्य सरकारने परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. केंद्र सरकारनेही असाच संयम दाखवायला हवा होता. बळाचा वापर करून प्रश्न मार्गी लावू शकतो असं जर केंद्राला वाटत असेल तर ते योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.