दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला पेटवले
लोणीकाळभोर : पत्नीने दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने घरातील स्टोव्हमधील डिझेल पत्नीच्या अंगावर टाकत तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना हवेेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. पत्नीने समयसूचकता दाखवत शरीरावर पाणी ओतुन घेतल्याने तिचा जीव वाचला. मात्र या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पती व दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती भागवत सायप्पा चौधरी व दिर साईनाथ चौधरी ( रा. निगडी, पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी यशोदा भागवत चौधरी ( वय २५, रा. पेठकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली ) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि.२५ ) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पती पत्नीला त्याचा भाऊ साईनाथ याच्या घरी चल म्हणाला. यावर तिने तुम्ही एकटे जा मी येत नाही असे सांगितले. याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर डिजेल ओतले. तुला जाळुन मारुन टाकतो, असे म्हणत पेटवले. पत्नीने समयसुचकता दाखवत बाहेर ठेवलेल्या बादलीतील पाणी डोक्यावरुन घेतले. यामध्ये तिचा डावा खांदा, डोक्याची डावी बाजु व चेह-याची डावी बाजु जळाली आहे. कहर म्हणजे, पतीने पत्नीला आता थोडक्यात वाचली, पुढच्या वेळी जास्त जाळून टाकेल अशी धमकी दिली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!