दुचाकी चोरणाऱ्या चोराला लोणीकंद गुन्हे शोध पथकाकडून अटक; दोन दुचाकी जप्त

 

लोणीकंद( सोमनाथ आव्हाळे ): दुचाकी चोरणाऱ्या चोराला लोणीकंद गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख ३० हजार रुपये किंमतीच्या दोन  दुचाकी जप्त करण्यात आले आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रितेश प्रल्हाद नानावत (वय 19 वर्षे रा. वढु खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी रोहित महादेव निंबाळकर (वय 22 वर्षे, रा. उबाळे नगर, वाघोली पुणेे) यानीी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित यांची ब्ल्यू इन हॉटेल चे पार्किंग मधे हॅण्डल लॉक करून लावलेली हिरो होंडा कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल क्र MH 45 X 9467 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी चे संमती शिवाय हॅण्डल लॉक तोडून चोरून नेल्याची गुन्हा दाखल

करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने  लोणीकंद गावचे हद्दीत डी बी पथक पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित व्यक्ती  नंबर प्लेट नसलेली दुचाकीवरून आळंदी फाटा, लोणीकंद येथे दिसला. डी बी पथकास त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास थांबवून त्याची चौकशी करून गाडीबाबत अभिलेख चेक केले असता सदर बाबत लोणीकंद पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. म्हणून त्याला पोलीस ठाण्यामध्ये आणून कसून चौकशी केली असता त्याने पौड पोलीस ठाणे हद्दीतील पिरंगुट येथून एक बजाज कंपनीची KTM DUKE 200 MH 12 PF 0640 ही देखील चोरलेबाबत कबुली दिल्याने सदरचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. आरोपीकडून एकूण 1 लाख ३० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. कोर्टाने त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदर कामगिरी डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण),  विवेक पाटील  (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग),  अमृत देशमुख (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग), प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, नवजीवन जाधव, सुभाष गारे, वेनुणाद ढोपरे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.