पुणे येथील सिनोत सिसोलेकर या बालकाची बालशक्ती पुरस्कार 2021 साठी निवड

 

पुणे : शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे येथील सिनोत सिसोलेकर या बालकाची बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड झाली आहे. सदर बालकाने नासा सीआयएस आंतरराष्ट्रीय 2019 स्पर्धा जिंकली आहे. ज्वालामुखी या विषयात सर्वोत्कृष्ट विज्ञान पुरस्काराने सन्मानित असुन, वन फॅमिली वन टेलीस्कोप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याची बाल शक्ती पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून 5 ते 18 वयोगटातील बालकांना शैक्षणिक, क्रिडा कला व संस्कृती, सामाजिक कार्य शैार्य व नाविण्यपुर्ण या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक व रोख रूपये 1 लाख या स्वरुपात प्रधानमंत्री बालक पुरस्कार देण्यात येतो. प्रधानमंत्री बालक पुरस्कार अंतर्गत बाल शक्ती पुरस्कार 2021 व बाल कल्याण पुरस्कार 2021 साठी केंद्रीय महिला व बाल विकास विभागाने ऑनलाईन अर्ज मागविलेले होते. पुणे जिल्ह्यासाठी बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी एकुण 17 बालकांचे अर्ज ऑनलाईन शासनास प्राप्त झाले होते. सदर पुरस्कारसाठी प्राप्त झालेले 17 बालकांच्या अर्जाची जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे कडून छाननी करण्यात आली. अर्जामधील महितीच्या व निकषाप्रमाणे 13 बालकांचे अर्ज पात्र आढळून आले. पात्र 13 बालकांचे अर्ज बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी जिल्हाधिकारी पुणे यांचे शिफारसीने केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील या 13 पात्र अर्जामधून केंद्र शासनाकडून पुणे येथील बालक सिनोत सिसोलेकर या बालकाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आली. सदर बालकाने नासा सीआयएस आंतरराष्ट्रीय 2019 स्पर्धा जिंकली आहे. ज्वालामुखी या विषयात सर्वोत्कृष्ट विज्ञान पुरस्काराने सन्मानित असुन, वन फॅमिली वन टेलीस्कोप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्याची बाल शक्ती पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिनोत सिसोलेकर या बालकाचा बाल शक्ती पुरस्कार 2021 साठी निवड झालेबद्दल सत्कार केला आहे.

बालक सिनोत सिसोलेकर व वेगवेगळया राज्यातुन बाल शक्ती पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल पुरस्कार्थी बरोबर 25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी पुणे जिह्यातील पुरस्कार्थी बालकाचे आई वडील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होते.

००००

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.