लुटारूंची बसवर दगडफेक, चालकांचा प्रसंगावधान पणा आणि बस लुटण्याचा प्रयत्न मोडीस
सोलापूर; सोलापूर येथील सुळेवाडी पिलीव घाटात कोरेगाव आगाराची बस सातारा सोलापूर एम एच ०६ एस ८९७१. रात्री साडेदहाच्या सुमारास जात असताना दरोडेखोरांनी बसवर दगडफेक करून बस लुटण्याचा प्रयत्न केला. बसचालकांनी प्रसंगावधान राखून बस सुखरूप मार्गस्थ केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित लुटारूंवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशीकांत शेळके यांनी मोठ्या शिताफीने सातारा सांगली भागातील संशयीत रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी केली असता यामध्ये अजून आठ लुटारुंचा समावेश आसल्याचे निष्पन्न झाले आहे. माळशिरस पोलिसांना तीन आरोपींना पकडण्यात यश आले असुन पुढील आरोपींचा तपास चालू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!