खा. अमोल कोल्हे यांच्या नावे खंडणी उकळणाऱ्याला पुणे पोलिसांकडून बेड्या

पुणे : बांधकाम व्यावसायीकास फोनवर आपण खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे खोटे सांगून फसवण्याचा प्रयत्न करणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. लॉकडाऊन काळात हा प्रकार घडला होता.

विशाल अरुण शेंडगे ( वय-३२ वर्ष रा. टिळेकरनगर लेन नं. ७, कात्रज कोंढवा रोड , इस्कॉन टेम्पल मागे पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  विशाल याने यापुर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावे फोन करुन कित्येकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नावाचा गैरवापर करुन एका प्रसिध्द बिल्डरला पैशाची मागणी केले बाबत चौकशी होवून कारवाई व्हावीी. याबाबतचा तक्रारी अर्ज शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे कार्यालयातून प्राप्त झालेला होताा.

सदर प्रकरणी गुन्हे शाखा २, पुणे यांनी तपास करुन तोतयागिरी करुन फसवणारा आरोपी विशाल यास निष्पन्न करुन त्याच्याविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपींनी यापूर्वीही
लॉकडाऊन मध्ये मी आमदार चंद्रकांत दादा बोलतोय, असे लोकसेवकाचे नावाचा वापर करुन फोन करुन फसवणूक केलेली आहे.

आरोपीवर याआधी कोथरुड पोलीस ठाण्यात २ तर अलंकार पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल आहेत.तसेच यापूर्वीही खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे.

वरील कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंग, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार विनोद साळुके, प्रदिप शितोळे, विजय गुरव,  संग्राम शिनगारे, शैलेश सुर्वे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर यांनी केलेली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.