चंदगड तालुक्यात लवकरच होणार राजकीय बदल…

 

गोपाळराव पाटलांचा भाजपाला रामराम,कॉंग्रेसमध्ये करणार प्रवेश ?

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त हाती आले आहे.यामुळे चंदगड तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून तालुक्यात येणाऱ्या आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलतं जाणार असल्याची माहिती समोर आली आहें

चंदगड येथे (बुधवार) दि.27 रोजी गोपाळराव गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.यावेळी या बैठकीमध्ये पुढची राजकीय वाटचाल कशी करायची याबद्दल निर्णय घेण्यात आले.राज्यात आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे कार्यकर्त्यांची म्हणावी तशी शासकीय अथवा इतर कामे होत नाहीत.तसेच भाजपा पक्षश्रेष्ठी व वरीष्ठ नेत्यांकडून दखल घेतली न गेल्याने व कार्यकर्त्यांना म्हणावे तसे बळ मिळत नसल्याने नाराजी वाढत गेली.

मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये गोपाळराव पाटील व त्यांच्या गटातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.त्यानंतर या गटातील कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत तालुक्यात भाजपाची ताकद वाढवत तळा-गाळापर्यंत पोहचन्याचे काम केले,मजबूत पक्षबांधणी केली.पण असें असूनही राज्यातील भाजपाच्या वरीष्ठ पक्षश्रेष्ठीं,नेत्यांकडून गोपाळराव पाटील गटाला भाजपकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही.त्यामुळे या गटात निराशा निर्माण झाली.

आज कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व वाढले आहे.तसेच गोकुळ,केडीसी (जिल्हा बँक) आणि भविष्यात अनेक संस्थांच्या निवडणुका पाहता तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील यांच्यावर पुढची राजकीय वाटचाल काँग्रेसबरोबर करावी असा अटाहास धरून मागणी लावून धरल्याचे राजकीय सूत्राकडून कळले आहें.

याबाबत काल (बुधवार) दि.27 रोजी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती.यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करावा असे सुचवले आहें.त्यामुळे आता निर्णय फत्ते झाल्याचे असले तरी प्रवेशाची तारीख अद्याप बाकी आहे.परिणामी,चंदगड तालुक्यात भाजपला मोठे भगदाड पडण्याची शक्यता असून गोपाळराव पाटील गट नक्की आपलं स्थान कोणत्या पक्षात निर्माण करणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहें.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.