थेऊरमध्ये जुन्या वादातुन युवकावर अमानुषपणे हल्ला,दोघे गजाआड एकजण फरार
थेऊर; (गणेश धुमाळ)काही दिवसापूर्वी झालेल्या जुन्या वादावरुन थेऊरमध्ये काल सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान चौकात एका युवकावर तिघांनी अमानुषपणे कोयत्याने हल्ला केल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला असून त्या युवकास लोणी काळभोर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी असलेल्या आकाश भंडारी याने दिलेल्या तक्रारी नुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रजासत्ताक दिन असल्याने चौकात मोठी गर्दी होती यावेळी अक्षय सोनवणे व त्याचे अन्य दोन जोडीदार बाबू उर्फ सुमित संजय लोंढे व सकट (पूर्ण नाव माहिती नाही) तो काम करत असलेल्या शुभम मोबाईल शाॅपीवर आले व मागील वादाचे कारण काढून तसेच अन्य एका मित्रासोबत का बोलतो याचा राग मनात धरुन आकाशला दुकानच्या बाहेर बोलावले व अक्षयने त्यास तुला सांगुनही ऐकत नाही आज तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार केला त्यानंतर बाबू आणि सकट यांनी त्याच्या जवळील कोयत्याने हातावर, नाकावर सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. स्वतःचा वाचविण्यासाठी तो तेथून पळत सुटला.त्यानंतर आकाशला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्या नंतर एका तासात हल्ला करणाऱ्या दोघांना गजाआड केले असून एक जण फरार आहे. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी असलेल्या आकाश भंडारी याने दिलेल्या तक्रारी नुसार,काल मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रजासत्ताक दिन असल्याने चौकात मोठी गर्दी होती यावेळी अक्षय सोनवणे व त्याचे अन्य दोन जोडीदार बाबू उर्फ सुमित संजय लोंढे व सकट (पूर्ण नाव माहिती नाही) तो काम करत असलेल्या शुभम मोबाईल शाॅपीवर आले व मागील वादाचे कारण काढून तसेच अन्य एका मित्रासोबत का बोलतो याचा राग मनात धरुन आकाशला दुकानच्या बाहेर बोलावले व अक्षयने त्यास तुला सांगुनही ऐकत नाही आज तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार केला त्यानंतर बाबू आणि सकट यांनी त्याच्या जवळील कोयत्याने हातावर, नाकावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले.
अक्षय धनंजय सोनवणे (वय १९ वर्षे) व बाबू उर्फ सुमित संजय लोंढे (वय १९ वर्षे) अशी आरोपींची नावे असुन या दोघांना अटक करून त्यामधील अन्य एक जण फरार झाला.
वरील कारवाई लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलिस नाईक नितीन सुद्रीक गणेश कर्चे. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख.यांनी केली असुन, फरार आरोपी चा तपास घेऊन लवकरात लवकर कारवाई करणार आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!